१) साधुंचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सध्दमाचे आचरण हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्ठ होय! इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यँत असाच चालू राहणार आहे. २) ब्रम्हदेवाचा पुत्र अत्रि व त्याच्या कठोर तपश्र्चर्येचे फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला आणि म्हणूनच तो अयोनीसंभव मानला जातो. ३) या अवतारात ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे व त्यांच्या परंपराचे ऐक्य आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी प्रसिध्द असलेल्या या तीन देवांचे एकरुपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय. ४) दत्तावतार हा ब्राम्हण कुलातील असून सती अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास महत्व आहे. ५) राम, कृष्ण इ.अवतार हे गृहस्थाश्रमी होते तर दत्तावतार हा फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमात राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा आहे. ६) हा अवतार म्हणजे साक्षात परब्रम्हमूर्ती श्रीसद्गुरुंचाच अवतार होय आणि म्हणूनच साधक "श्री गुरुदेव दत्त"असायांच्या नावाचा जयघोष करतात. ७) श्रीदत्त हे केवळ गुरुदेव नसून ते "अवधूत चिंतन श्री गुरुदेव ...
दैनिक पंढरी संचार Editorial इव्हेंट झाला , आता कल्चर रुजावे ! पंढरपूरकर दहा किलोमीटर पळाले . इतिहासामध्ये पहिल्यांदाच शहरांमध्ये आयोजित मॅरेथॉन मधून शहराला एक नवी प्रेरणा मिळाली. यातून काहीही आर्थिक लाभ होणार नाही असे दाते , प्रायोजक आणि रनर्स असलेले सामान्य पंढरपूरकर यांना या यशस्वी संकल्पनेचे श्रेय द्यायला हवे. तथापि ’ फंड गॅदरिंग इव्हेंट ’ च्या पुढे जाऊन आरोग्यदायी चळवळ म्हणून या शहरात ’ रनिंग कल्चर रुजले जावे ’ यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. - - - कुठलीही संकल्पना यशस्वी होण्यासाठी लागते ती इच्छाशक्ती आणि त्यानंतर त्याचे आर्थिक नियोजन ! शहरातील काही डॉक्टर मंडळींनी दाखवलेली प्रबळ इच्छाशक्ती ही पंढरपूर मॅरेथॉनच्या यशस्वितेच्या पाठीमागची खरी शक्ती आहे, त्यामुळे त्यांना श्रेय दिले पाहिजे, तथापि त्यानंतर या संकल्पनेला आर्थिक बळ दिले ते डि.व्ही.पी. उद्योग समूहाचे अभिजीत पाटील यांनी ! त्यांच्या संकल्पनेला, प्रयत्नांना साथ दिली ती यामध्ये पळणार्या अडीच ह...