दैनिक पंढरी संचार
Editorial
इव्हेंट झाला ,
आता कल्चर रुजावे !
पंढरपूरकर दहा किलोमीटर पळाले . इतिहासामध्ये पहिल्यांदाच शहरांमध्ये आयोजित मॅरेथॉन मधून शहराला एक नवी प्रेरणा मिळाली. यातून काहीही आर्थिक लाभ होणार नाही असे दाते , प्रायोजक आणि रनर्स असलेले सामान्य पंढरपूरकर यांना या यशस्वी संकल्पनेचे श्रेय द्यायला हवे. तथापि ’ फंड गॅदरिंग इव्हेंट ’ च्या पुढे जाऊन आरोग्यदायी चळवळ म्हणून या शहरात ’ रनिंग कल्चर रुजले जावे ’ यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत.
- - -
कुठलीही संकल्पना यशस्वी होण्यासाठी लागते ती इच्छाशक्ती आणि त्यानंतर त्याचे आर्थिक नियोजन ! शहरातील काही डॉक्टर मंडळींनी दाखवलेली प्रबळ इच्छाशक्ती ही पंढरपूर मॅरेथॉनच्या यशस्वितेच्या पाठीमागची खरी शक्ती आहे, त्यामुळे त्यांना श्रेय दिले पाहिजे, तथापि त्यानंतर या संकल्पनेला आर्थिक बळ दिले ते डि.व्ही.पी. उद्योग समूहाचे अभिजीत पाटील यांनी ! त्यांच्या संकल्पनेला, प्रयत्नांना साथ दिली ती यामध्ये पळणार्या अडीच हजार पंढरपूरकरांनी. तसे पाहिले तर हा एक दिवसाचा-तीन तासाचा इव्हेंट! पण यासाठी अनेक हात गेल्या सहा महिन्यांपासून राबत होते, नेटके नियोजन आणि नवीन काहीतरी करण्याची उर्मी त्याचा पाठीमागे होती. पंढरपुरात हा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्यामुळे धाकधूक देखील होती, परंतु आर्थिक ताकदीची तयारी ठेवून त्याच्या पाठबळावर ही संकल्पना प्रत्येक शहरवासीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभिजीत पाटील यांनी साथ दिली आणि संकल्पना यशस्वी करून दाखवली. यामध्ये मार्गदर्शक म्हणून सोलापूरचे श्री. वाघचौरे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली. पंढरपूरमध्ये मॅरेथॉन झाली, आता हा प्रकार एका दिवसापुरता मर्यादित न राहता खर्या अर्थाने रनिंग कल्चर म्हणून रुजण्यासाठी ही एक प्रेरणादायक पायवाट ठरावी अशी अपेक्षा आहे. आपल्याला तीन किलोमीटर किंवा दहा किलोमीटर पळायचे आहे म्हणून अनेक पंढरपुरकरांनी गेल्या दोन महिन्यापासून रनिंगची प्रॅक्टिस सुरू केली होती. अनेक जण ट्रॅकवर आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर पळताना दिसत होते. एक आव्हान म्हणून सर्वांनी उर्जा वाढवली होती, जीवनशैली स्वीकारली होती. फक्त मॅरेथॉन संपली की सकाळचे रनिंग थांबू नये यासाठी हा प्रेरणास्त्रोत कायम ठेवला पाहिजे. हे प्रयत्न व्यायामाचे कल्चर रुजावे यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पंढरपूरकरांसाठी हा केवळ एका दिवसाचा इव्हेंट न ठरता आता यापुढे सर्वांनी रनिंग अॅक्टिव्हिटी म्हणून पुढे येणे गरजेचे आहे. यात सहभागी झालेल्या सर्वांकरिता काहीतरी चळवळ आयोजकांनी सुरू केली पाहिजे. व्यायामाचे महत्व, पळण्याचे महत्त्व, त्यातून संवर्धित होणारी
आरोग्यशक्ती, यातील सातत्यामुळे टाळले जाणारे आजार याबाबत सातत्याने सादरीकरण झाले पाहिजे. एक लाख लोकसंख्येच्या या शहरात पंधराशे पळाले आहेत. आपल्याला किती जणांपर्यंत पोहोचायचे आहे याचे आव्हान आयोजकांच्या लक्षात आले असेल. महानगरांमध्ये मोठमोठे रनिंग क्लब आहेत, सोलापूर, पुणे, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरांमधून उभारणारे जॉगर पार्क, जिमखाना हे देखील अशाच संकल्पनेमधून वाढले आहेत. त्यामुळे त्या शहराची एक संस्कृती बनली आणि ते एक्सरसाइज कल्चर त्यांच्या जीवनशैलीमध्ये उतरले. कोणीतरी याची सुरुवात करायला हवी असते, आज पंढरपूरमध्ये योगाचे क्लासेस चालतात. वेगवेगळ्या आठ ते दहा योगा वर्गातून सकाळी योगासने आणि प्राणायाम वर्ग होतात. योगा रुजवण्याचे प्रयत्न काही लोकांनी केले. तशाच पद्धतीने रनिंग रुजविण्यासाठी आयोजकांनी यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. एक दिवस येऊन पळल्याने काहीच होणार नाही. यातही काहीजण हे सेल्फी किंवा फेसबुकवर फोटो टाकण्यासाठी देखील पळले आहेत, परंतु त्यांचेही स्वागतच केले पाहिजे. तेही कुठेतरी प्रेरणादायी ठरतात. यात सातत्य राहिले पाहिजे. यासाठी काही निश्चित उपक्रम-कार्यक्रम ठेवणे गरजेचे आहे

Comments
Post a Comment