श्री रामदास स्वामींची " भीमरुपी हनुमान स्तोत्रा " संबंधीत अद्भुत कथा ( माहीत नसणार्यांसाठी)
श्री स्वामी चाफळच्या नदीवर रोज पहाटे स्नानसंध्या करायला जात, संध्यावंदनानंतर सुर्योदयापासुन ते माध्यान्हापर्यंत गुडघाभर पाण्यात " ऊभे" राहुन " श्रीराम जय राम जय जय राम " या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करत असत.माध्यान्ह झाल्यावर भिक्षा मागण्यास जात असत ( हल्लीची समजता ती " भिक नव्हे , "भिक" व "भिक्षा" यात जमिन आस्मानचा फरक आहे, तो कसा हे सुद्न्य वाचकांस सांगणे न लगे) तर त्या जपकाळात नदीच्या पलीकडील कठावरच्या एका उंच झाडावर स्वामी यायच्या आधीपासुनच एक भलेमोठे " वानर" बसत असे स्वामी त्याला रोज पहात ( वो कौन है? क्या है ? ये बात स्वामी बखुबी जानते थे) पण ते आपली साधना चालु ठेवीत, मनात त्यानाही ऊत्सुकता होती " पाहु कितने दीन तक ये सिलसीला चलता है " दोघेही चिवट हार मानण्यास कुणी तयार नव्हते, असा क्रम अखंड बारा वर्षे चालु होता खंड न पडता नाहीतर आपण " तेरड्याचा रंग " तीन" दीवस, असो. ज्या दीवशी हा मंत्रजप पुर्ण झाला त्या दीवशी त्या वानराने झाडावरुन " खाली ऊडी मारली व समर्थांजवळ महाकाय रुपात येऊन त्यांना कडकडुन मिठी मारली त्याचक्षणी स्वामींच्या मुखातुन हे दीव्य स्तोत्र बाहेर पडले, हे प्रद्न्याबुद्धीने " स्फुरलेल्या " स्तोत्रांमधे "जान" (प्राण) असतो, जी काही स्तोत्रे मंत्र आजपर्यंत झाली आहेत ती " स्फुरलेली" आहेत " मी करतो म्हणुन केलेली" नाहीत, ( जसा एखादा प्रतिभावंत कविला विषय दीला की तो कवीता करायला " बसतो" ) हे स्तोत्र पुर्ण झाल्यावर हनुमंतांनी त्याना " साक्षात अख्खे दर्शन दिले" तर अशी ह्या स्तोत्रामागे १३ कोटी जपाची तपस्या आहे,
Comments
Post a Comment